Welcome to Mahadesh Farms

महादेश आंबा शेतकरी उत्पादक कंपनी

कंपनीचे उद्दिष्ट 1.शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले उत्पादन खरेदी करून त्याची थेट विक्री करून देणे. महादेश एक्स्पोर्ट हब मार्फत एक्सपोर्टर आणि व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांशी जोडून देणे.यामुळे शेतकरी सदस्यांच्या वेळ, विक्रीचा खर्च, वजनात होणारे नुकसान, किंमतीतील चढउतार, वाहतूक, गुणवत्ता व देखभाल यांत होणा-या खर्चात बचत करणे . 2.महादेश मार्ट मार्फत भारतातील मोठ्या शहरामध्ये विक्रीसाठी नेटवर्क उभा करणे आणि तेथील व्यापाऱ्यांना महाराष्ट्रातील आंबा उपलब्ध करुन देत आहे. 3.सदस्य शेतक-यांना कमी खर्चात आणि दर्जेदार निविष्ठा पुरवठा करणे . यामध्ये रासायनिक जैविक खते ,कीटकनाशके, बुरशीनाशके , निरोगी कलमे पुरवणे किंवा शेतात बांधून देण्याची व्यवस्था उभी केलेली आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात तयार केलेली कलमे विक्री करून देण्याचे कार्य कंपनी करत आहे. 4.4. शेतकऱ्यांना आवश्यक माहिती जसे , हवामानाचा अंदाज, बाजार भाव तसेच पिकाबाबत तंत्रज्ञान अश्या प्रकारची माहिती वेळेत उपलब्ध करून देणे . 5. शेतकरी कंपनीचे संकेतस्थळ व अँप च्या माध्यमातून वेळच्या वेळी मार्गदर्शन , आंबा उत्पादक शेतकरी सदस्या साठी लागणाऱ्या

About Mahadesh Farms

🌿 मिशन (Mission) – शाश्वत शेती, सशक्त शेतकरी

✅ शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करणे

✅ गुणवत्तापूर्ण शेती निविष्ठा, कीडनाशके, खते, आणि सेंद्रिय उत्पादने पुरवणे

✅ शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीला चालना देणे, मध्यस्थांचा हस्तक्षेप कमी करणे

✅ निर्यातीसाठी आंबा आणि इतर शेतीमालाचे प्रमाणित उत्पादन आणि प्रक्रिया करणे

✅ शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठांमध्ये संधी उपलब्ध करून देणे

🌍 व्हिजन (Vision) – जागतिक दर्जाची कृषी क्रांती

महादेश फार्म्सचा दीर्घकालीन दृष्टिकोन म्हणजे भारतीय कृषी क्षेत्राला आधुनिक विज्ञान, डिजिटल तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठांशी जोडणे.

🌟 भारताचा आंबा ब्रँड म्हणून महादेश मँगो जागतिक स्तरावर पोहोचवणे

🌟 शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे

🌟 नवीन कृषी संशोधन आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन क्षमता वाढवणे

🌟 शाश्वत आणि सेंद्रिय शेतीला चालना देऊन पर्यावरणपूरक शेतीला प्रोत्साहन देणे

🌟 शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेती क्षेत्रात व्यवसायिकता आणणे

🤝 महादेश टीम – नेतृत्व आणि प्रेरणा/h3>

महादेश फार्म्स ही केवळ संस्था नसून, एका मजबूत नेतृत्वाखाली काम करणारी एक संघटना आहे. आमच्या टीममध्ये अनुभवी कृषीतज्ज्ञ, बाजार विश्लेषक, निर्यात व्यवस्थापक आणि आधुनिक तंत्रज्ञानतज्ज्ञ आहेत.

संस्थापक आणि नेतृत्व

सचिन नलवडे – संस्थापक अध्यक्ष

(कृषी व्यवस्थापन, शेतकरी संघटन आणि आंबा निर्यात क्षेत्रातील तज्ज्ञ)

👨‍💼 व्यवस्थापन टीम

सचिन नलवडे – संस्थापक अध्यक्ष

कृषी संशोधन विभाग – आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि संशोधन

विपणन आणि विक्री विभाग – महा मँगो आणि महादेश हब व्यवस्थापन

निर्यात आणि लॉजिस्टिक विभाग – आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठी नियोजन

ग्राहक सेवा आणि प्रशिक्षण विभाग – शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन आणि कार्यशाळा

📜 इतिहास – महादेश फार्म्सचा प्रवास

महादेश फार्म्सची सुरुवात शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून आणि त्यांना थेट बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी झाली.

🔹 २०१० – आंबा उत्पादन आणि निर्यात क्षेत्रात संशोधन सुरू

🔹 २०१५ – महादेश फार्म्सची औपचारिक स्थापना

🔹 २०१८ – आंबा विक्री व्यवस्थापनासाठी "महादेश मँगो हब" संकल्पना सुरू

🔹 २०२० – महा मँगो (www.mahamango.com) ऑनलाइन विक्री प्लॅटफॉर्म सुरू

🔹 २०२३ – निर्यातीसाठी महादेश एक्सिम प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना

🔹 २०२५ – महाराष्ट्रभर महादेश हब्स सुरू करण्याचे उद्दिष्ट

🚀 पुढील वाटचाल

महादेश फार्म्स भविष्यात महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतभर शेतकरी उत्पादन कंपन्या मध्येमातून , विक्री हब आणि निर्यात केंद्रे उभारण्याचा संकल्प केला आहे. याचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना स्वतंत्र, सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध बनवणे हा आहे.

📞 संपर्क: 7775043777 / 7775091777

🌍 वेबसाइट:

🔗 www.mahadeshfarms.com

🔗 www.mahamango.com

🔗 www.mahadeshfarmsfoundation.com